Home अकोले दहावीच्या परीक्षेत अकोले तालुक्यात प्रथम येण्याचा मान कु. मृणाल मोखरे हिने मिळविला

दहावीच्या परीक्षेत अकोले तालुक्यात प्रथम येण्याचा मान कु. मृणाल मोखरे हिने मिळविला

अकोले: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल नुकताच लागला. यात कु. मृणाल मधुकर मोखरे हिने घवघवीत यश संपादन करत अकोले तालुक्यात प्रथम येण्याचा मान मिळविला आहे.

अकोले तालुक्यातील कु. मृणाल मधुकर मोखरे हिने दहावीच्या परीक्षेत ९४.६० टक्के गुण मिळवून अकोले तालुक्यात प्रथम आली आहे. ती अगस्ती विद्यालयात शिकत होती. अगस्ती विद्यालयाच्या सर्व शिक्षकांचे व प्राचार्याचे मार्गदर्शन लाभले. तसेच तिच्या या यशाबाबत आई वडिलांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तिच्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.  

Website Title: Mrunal Mokhare SSC exam first in akole Taluka

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here