निळवंडेच्या कालव्यांना गती देण्यासाठी अकोलेत भव्य मोर्चा
अकोले | Akole: महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांच्या बाजुचे, जनतेचे सरकार आहे सरकारने आत्तापर्यत कधीही निळवंडे धरण व कालव्याचे कामाना निधी कमी पडू दिला नाही.आता प्रशासनातील अधिका-यानी त्यांची जबाबदारी पार पाडताना उच्चस्तरीय कॅनालच्या कामात संगमनेरची पाइपलाईन हलवून जलसेतुचे कॅालम एक महिन्यात पूर्ण करावे अन्यथा एक महीन्यानंतर हे आंदोलक स्वतः पाइप लाइन उखडुन फेकतील तसेच नविन वर्षात २०२२ मध्ये उच्चस्तरीय कॅनालचे काम पूर्ण होऊन शेतकऱ्यांना पाणी मिळाले पाहिजे अशी सुचना आ.डॅा.किरण लहामटे यांनी केली आहे.
निळवंडे धरणाचे उच्चस्तरीय कालव्याचे संथ गतीने सुरु असलेल्या कामाला गती मिळावी यासाठी तालुक्यातील सर्वपक्षीय शेतकऱ्यांचे वतीने पाणी हक्क मोर्चा काढण्यात आला.महात्मा फुले चाैकापासुन भव्य मोर्चा बाजारतळावर येवून तेथे सभा घेण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ शेतकरी खंडुबाबा वाकचाैरे होते.याप्रसंगी आ.लहामटे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राज्याचे शेतकरी नेते डॅा.अजित नवले,कॅा.कारभारी उगले, मच्छिंद्र धुमाळ,सीताराम भांगरे,जालिंदर वाकचाैरे,विनय सावंत, महेशराव नवले,डॅा.रवींद्र गोर्डे,पर्बतराब नाईकवाडी, गिरजाजी जाधव,मच्छिंद्र मंडलिक,सुरेशराव खांडगे,अप्पासाहेब आवारी,स्वातीताई शेणकर,प्रमोद मंडलिक,भाग्यश्री आवारी,माधव भोर,जे.डी.आंबरे,कविराज भांगरे,निता आवारी,किरण गजे,सुरेश भोर,सुरेश नवले आदिसह अनेक मान्यवर नेते उपस्थित होते.
यावेळी आ.डॅा.लहामटे पुढे म्हणाले कि राज्यासह तालुक्यात दुष्काळ सदृष्य परिस्थिती आहे .अपेक्षित पाऊस झालेला नाही.त्यामुळे पाणी टंचाईची जाणिव प्रखरतेने होत आहे त्यात धामणगाव आवारी,अंबड,वाशेरे,
औरंगपुर आदि गावाच्या लोकांना उच्चस्तरीय कालव्याचे पाणी मिळण्यासाठी लोक वाट पाहत आहे मात्र या कालव्याचे काम अतिशय संथ गतीने होत असल्याने या कामास प्रशासनाने गति द्यावी व सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आजचा हा मोर्चा काढण्यात आला आहे.मी सरकारचा प्रतिनिधी म्हणून हा आवाज सरकारपर्यत पोहचविणार आहे मला राजकारणात कोण काय म्हणेल याला महत्त्व नाही तर माझ्या माय बाप जनतेचे प्रश्न महत्वाचे आहे.
निळवंडे कालव्याचे ॲक्वाडक पहीले मंजूर असताना नंतर संगमनेरची पाईप लाईन गेली त्यास प्रशासनाचीच चूक आहे ना. मग प्रशासनातील अधिकारीनीच आत्ता दिलेल्या शब्दानुसार एक महिन्यात संगमनेर पाईप लाईनचे पाईप हलवून ॲक्वाडक चे कॅालम उभे करावे अन्यथा शेतकरी पुन्हा आंदोलन करतील असा इशारा देवून उच्चस्तरीय कालव्याचे काम नवीन वर्षात २०२२ च्या जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात पूर्ण करुन शेतकऱ्यांना पाणी द्यावे त्यासाठी मी स्वतः सरकारकडून सर्व मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहील व लवकरच राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचेबरोबर आंदोलकाची नेते व काही गावातील सरपंचाची बैठक आयोजित करु असे सांगितले.
प्रशासनाचे वतिने जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता संगिता जगताप, प्रमोद माने,एम.बी क्षीरसागर, प्रभारी पोलिस निरीक्षक मिथुन घुगे, उपस्थित होते.प्रास्तविक व स्वागत बाळासाहेब भोर यांनी सुत्रसंचलन गणेश पापळ यांनी केले.
सकाळी ११ वा अकोले शहरातून शेतकऱ्यांचा हा भव्य मोर्चा निघाला यामध्ये अग्रभागी बहुसंख्य महीला होत्या तर अनेक शेतकरी आपल्या ट्रॅक्टर व अवजारासह या मोर्चात सहभागी झाले होते.शेवटी शेतकरी महिलांचे हस्ते अधिका-यानां निवेदन देण्यात आले.
जुन २०२२ पर्यत शेतकऱ्यांना पाणी देवु- कार्यकारी अभियंता: संगिता जगताप
या मोर्चाला उत्तर देताना जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता संगिता जगताप म्हणाले की, म्हाळादेवी ॲक्वाडकचे काम ७० टक्के पूर्ण झाले आहे राहिलेले ३० टक्के काम मे २०२२ पर्यत पूर्ण होईल. उच्चस्तरीय कालव्याचे ४०० मीटर पर्यत काम झालेले असुन ॲक्वाडेटचे काम झालेनंतर एक महिन्यात पूर्ण करुन जुन २०२२ पर्यत शेतकऱ्यांना पाणी देण्याचे नियोजन पूर्ण झाले आहे.इतर महामार्गावरचे सेतु हे वाहनांसाठी असतात मात्र हे जलसेतु तुन पाणी वाहून जात असते तसेच हे काम नदिपात्रात आहे,२९ मीटर उंचीचे आहे त्यामुळे कॅाक्रिटला ठराविक वेळ द्यावा लागतो.चांगल्या दर्जाचे काम करावे लागते.
अंबड, धामणगाव आवारी, धुमाळवाडी, औरंगपूर, पानसरवाडी, परखतपूर व वाशेरे या गावांसाठी उजवा उच्चस्तरीय कालवा व बहिरवाडी, ढोकरी, टाकळी, खानापूर, गर्दनी व तांभोळ येथील शेतकऱ्यांसाठी डावा उच्चस्तरीय कालवा मंजूर करण्यात आला. उजव्या उच्चस्तरीय कालव्याचे काम तीन वर्षांपूर्वीच पूर्ण झाले. मात्र नदी पात्रातील जलसेतूचे काम गेली अनेक वर्षे रेंगाळत ठेवल्यामुळे उजव्या उच्चस्तरीय कालव्यामध्ये पाणी सोडता आलेले नाही. अकोले तालुक्यातून इतर तालुक्यांमध्ये पाणी वाहून नेण्यासाठी निम्नस्तरीय कालव्यांची कामे अत्यंत जलद गतीने सुरू आहेत. अत्यंत कठीण डोंगर फोडून व रस्त्यांवर पूल बांधून, ओढे नाले ओलांडत ही निम्नस्तरीय कालव्यांची कामे अतिजलद गतीने पूर्ण केली जात आहेत. उच्चस्तरीय कालव्यामध्ये पाणी सोडण्यासाठी आवश्यक असलेल्या जलसेतुचे काम मात्र हेतुतः वर्षानुवर्षे अपूर्ण ठेवले जात आहे. उजव्या व डाव्या उच्चस्तरीय कालव्यांचे सिंचन क्षेत्र विस्तारण्यासाठी दिलेले पुरवणी प्रस्तावही प्रलंबित आहेत.
प्रमुख मागण्या:
उजव्या उच्चस्तरीय कालव्यात पाणी सोडून शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळावे यासाठी प्रवरा नदीवरील जलसेतूचे काम अत्यंत तातडीने पूर्ण करा.
उजव्या व डाव्या उच्चस्तरीय कालव्यांची शिवारातील अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करा.
डोंगरांच्या पायथ्यापर्यंतचे क्षेत्र सिंचित व्हावे यादृष्टीने कालवे व उप कालव्यांचा विस्तार करून, ही विस्तारीत कामे तातडीने पूर्ण करा.
भंडारदरा व निळवंडे जलसाठ्याचे संयुक्त जलव्यवस्थापन करून अकोले तालुक्यातील शेतीला बारमाही पाणी द्या.
Web Title: Akole to speed up the canals of Nilwande