Home अकोले अकोले: दुचाकीवर चाललेल्या दाम्पत्यावर बिबट्याच्या जोडीने चढविला हल्ला

अकोले: दुचाकीवर चाललेल्या दाम्पत्यावर बिबट्याच्या जोडीने चढविला हल्ला

Akole two-wheeler were attacked by Bibatya

अकोले: अकोले तालुक्यातील ढोकरी शिवारात बिबट्याच्या जोडीने दुचाकीवर जात असलेल्या एका दाम्पत्यावर हल्ला केल्याची घटना सोमवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घडली. या हल्ल्यात दुचाकीवर मागे असलेली महिला जखमी झाली आहे. नागरिकांच्या सतर्कतेने बिबट्याने उसाच्या शेतात पळ काढला.

ढोकरीहून अकोले येथे दुचाकीहून जात असलेल्या कैलास माधव पुंडे व पत्नी मनीषा पुंडे यांच्यावर गावालगत शिवारात उसात दबा धरून बसलेल्या बिबट्याने मोटारसायकल वर झेप घेतली. या हल्ल्यात ,मनीषा पुंडे यांच्या कंबरेवर व पायावर पंजा मारला. यामुळे त्या जखमी झाल्या असून त्यांच्यावर अकोले ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. परिसरातील जवळपासच्या लोकांनी आरडाओरडा केल्याने बिबट्याने उसाच्या शेतात पोबारा केला. या अगोदरही शरद शेटे यांच्यावर बिबट्याने हल्ला केला होता. या घटनेने परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांनी वनविभागाकडे तातडीने पिंजरा लावण्याची मागणी केली आहे.

Web Title: Akole two-wheeler were attacked by Bibatya

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here