Home अकोले अकोले: पटसंख्या अभावी शाळा बंद केल्यास जनआंदोलन छेडणार आ. पिचड

अकोले: पटसंख्या अभावी शाळा बंद केल्यास जनआंदोलन छेडणार आ. पिचड

अकोले: अकोले तालुका हा अतिदुर्गम डोंगराळ ग्रामीण भागातील असून तालुक्यात तीव्र दुष्काळ असताना शासनाने  पटसंख्या अभावी शाळा बंद करणे म्हणजे विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रकार आहे. त्यामुळे पटसंख्या अभावी तालुक्यातील एकही शाळा बंद बंद करू नये अन्यथा जनआंदोलन उभारण्यात येईल असा इशारा आ. वैभवराव पिचड यांनी दिला.

राज्यातील जिल्हा परिषद चालवीत असलेल्या शाळांपैकी  पटसंख्या कमी असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय राज्याचे शिक्षण सचिव यांनी दोन वर्षापूर्वी घेतला होता. मागील वर्षी जिल्ह्यातील पटसंख्या अभावी शाळा बंद करण्यात आल्या होत्या. चालू शैक्षणिक वर्षातही तशाच प्रकारे कमी पटसंख्या असलेल्या शाळेची माहिती शासनाने मागविली आहे. त्यामुळे शासनाच्या सर्व्हेनुसार अकोले तालुक्यातील कमी पटसंख्या असलेल्या शाळा आहेत. मात्र अकोले तालुका ग्रामीण व डोंगराळ अतिदुर्गम भागात असून खेडोपाडी वाड्या वस्त्यांवर विखुरलेल्या आहेत. शाळेत जाण्यासाठी रस्ते नाहीत. या शाळा पटसंख्या अभावी शाळा बंद केल्यास आदिवासी दुर्गम भागातील मुलांना शिक्षणापासून वंचित राहावे लागेल. पटसंखेच्या कारणावरून एकही शाळा बंद करू नये अन्यथा तालुक्यात मोठे जनआंदोलन उभे करण्यात येईल असा इशारा वैभवराव पिचड यांनी प्रसिद्धी पत्रकात दिला आहे.  

Website Title: Akole Vaibhav Pichad school is closed for want of absence

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here