Home अकोले अकोले ब्रेकिंग: युवकाचा शेततळ्यात बुडून मृत्यू

अकोले ब्रेकिंग: युवकाचा शेततळ्यात बुडून मृत्यू

Akole News:  डोंगरगाव येथे पोहण्यासाठी गेलेल्या 16 वर्षीय युवकाचा शेततळ्यात बुडून (drowned) दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना.

Akole Youth drowned in farm

अकोले:  तालुक्यातील डोंगरगाव येथे पोहण्यासाठी गेलेल्या 16 वर्षीय युवकाचा शेततळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. करण सुदाम एखंडे असे पाण्यात बुडालेल्या युवकाचे नाव आहे. करण हा त्याच्या मित्रांसोबत सायंकाळी 4 वाजता पोहण्यासाठी गेला असता, तो पाण्यात बुडाला असल्याची प्राथमिक माहिती समजत आहे.

करण एखंडे याचे मूळ गाव अकोले तालुक्यातील टाहाकारी येथिल आहे. गेल्या 20 वर्षांपासून त्यांचे कुटुंब उदरनिर्वाहासाठी गणोरे गावात वास्तव्यास आहे. ही घटना डोंगरगावातील गोरक्ष किसन उगले यांच्या शेततळ्यात घडली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस नाईक अजित घुले करत आहेत. या दुर्दैवी घटनेने डोंगरगाव, गणोरे, टाहाकारी गावावर मोठी शोककळा पसरली आहे.

Web Title: Akole Youth drowned in farm

Sangamner Akole News Whats app Marketing

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here