Home क्राईम संगमनेरात एकतर्फी प्रेमातून तरुणीचा विनयभंग व मारहाण

संगमनेरात एकतर्फी प्रेमातून तरुणीचा विनयभंग व मारहाण

Sangamner Crime:   तरुणीला मारहाण करुन तिच्या अंगावरील टी शर्ट ओढून तीचा विनयभंग (Molested).

Molested and beating of a young woman due to one-sided love in Sangamner

संगमनेर:  एकतर्फी प्रेमातून युवतीला मारहाण करून तिचा अपमानास्पद वागणूक दिल्याची घटना शनिवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास शहरातील टॉपटेन मार्केट परिसरात घडली. याप्रकरणी एका जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील एका ब्युटी पार्लर मध्ये काम करणार्‍या युवतीला आकाश ज्ञानदेव पवार (रा. शिर्डी) हा वारंवार त्रास द्यायचा. ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे, तु माझ्याशी बोलली नाही तर मी आत्महत्या करेल’ अशी धमकी त्याने दिली. मी तुझ्याशी बोलणार नाही असे युवतीने त्याला समजावून सांगितले.

यानंतर सदर युवकाने पार्लरच्या पार्किंग मध्ये जाऊन सदर युवतीचे केस ओढून खाली पाडले. मारहाण करुन तिच्या अंगावरील टी शर्ट ओढून तीचा विनयभंग केला. युवतीच्या घरासमोर जावुन त्याने सदर युवतीचे आई, वडील, भाऊ यांना शिविगाळ करून युवतीच्या वडील व भाऊ यांना मारहाण केली.

याबाबत सदर युवतीने शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी आकाश पवार याच्याविरुद्ध विनयभंगासह मारहाण व धमकी दिल्याप्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहाय्यक फौजदार शेख करत आहेत.

Web Title: Molested and beating of a young woman due to one-sided love in Sangamner

Sangamner Akole News Whats app Marketing

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here