Home अकोले अकोलेत ट्रॅक्टर उलटून अपघात; युवक ठार – Accident

अकोलेत ट्रॅक्टर उलटून अपघात; युवक ठार – Accident

Breaking News | Akole: ट्रॅक्टर उलटून झालेल्या अपघातात (Accident) एक महाविद्यालयीन युवक जागीच ठार झाल्याची घटना.

Akole tractor overturn accident Youth killed

अकोले: ट्रॅक्टर उलटून झालेल्या अपघातात एक महाविद्यालयीन युवक जागीच ठार झाल्याची घटना काल सकाळी ८ वाजता अकोले शहरातील महात्मा फुले चौक येथे घडली. साहिल गणपत आवारी (वय १८, रा. धामणगाव आवारी, ता. अकोले) असे या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अकोले येथील मॉडर्न ज्युनिअर कॉलेज येथे साहिल आवारी हा १२ वी मध्ये शिक्षण घेत होता. ट्रॅक्टर हा शोरूमला घेऊन जात असतांना महात्मा फुले चौका जवळ अचानक चालकाचा ताबा सुटल्याने ट्रॅक्टर उलटून ट्रॅक्टर खालीच दबल्याने त्याचा मृत्यू झाला. मयत साहिल हाच ट्रॅक्टर चालवत होता. अपघातानंतर स्थानिकांनी ट्रॅक्टर बाजुला करून त्याला बाहेर काढले. उपचारासाठी त्याला येथील खासगी हॉस्पिटलमध्ये नेण्यात तेथे उपचारा पूर्वीच प्राणज्योत मालवली.

त्याचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. तेथे शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. अकोले पोलिसांत याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्याच्या दुदैवी निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Web Title: Akole tractor overturn accident Youth killed

See also: Breaking News live,  Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation StudyCrime News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here