Home अहमदनगर अहमदनगर ब्रेकिंग!  आढळला मानवी हाताचा पंजा अन् हाड

अहमदनगर ब्रेकिंग!  आढळला मानवी हाताचा पंजा अन् हाड

Breaking News | Ahmednagar: अज्ञात इसमाच्या हाताचा पंजा व एक हाड सापडले.

Claw and bone of human hand found

पाथर्डी :  तालुक्यातील निपाणी जळगाव शिवारात अज्ञात इसमाच्या हाताचा पंजा व एक हाड सापडले आहे. सहायक पोलिस निरीक्षक रामेश्वर कायंदे यांनी पोलिस पथकासह घटनास्थळी दाखल होत, हाताचा पंजा व हाड ताब्यात घेऊन, वैद्यकीय तपासणीसाठी पाठविले आहेत. त्यानंतरच या गुन्ह्याचा उलगडा होणार आहे.

चंपा भोसले हे निपाणी जळगाव शिवारातील राहत्या घरून मंगळवारी (दि.२) सकाळी ९ च्या सुमारास पाथर्डीकडे येत होते. यावेळी त्यांना त्यांच्या शेतात रस्त्याच्या कडेला एक मानवी शरीराचा हाताचा पंजा व एक हाड पडलेले दिसले. त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता हे अवयव मानवी शरीराचे असल्याचे दिसले. त्यांनी तत्काळ पाथर्डी पोलिसांना माहिती दिली.

पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत आजूबाजूला पाहणी करून या मानवी शरीराचे अजून काही भाग या परिसरात आहे का? याचा शोध घेतला. त्याचप्रमाणे नेमके हे शरीराचे अवयव कुठून व कसे आले? याचा तपास पोलिस करीत आहे. याप्रकरणी पाथर्डी पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक श्रीकांत डांगे करीत आहेत.

Web Title: Claw and bone of human hand found

See also: Breaking News live,  Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation StudyCrime News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here