Home अहमदनगर तिघांचंही प्रेम ! आवड निवड मी कशी करू?

तिघांचंही प्रेम ! आवड निवड मी कशी करू?

Ahmednagar News: धर्मावर, चुकीच्या पध्दतीने काम करणारा पवार परिवार नसून विकासला प्राधान्य देणारा हा परीवार देशाच्या, महाराष्ट्राच्या हितासाठी एक राहिला पाहिजे. आमदार नीलेश लंके (Nilesh Lanke) यांची भूमिका.

All three love! How do I select a preference for Nilesh Lanke

पारनेर : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात फुट पडल्यामुळे नेते व कार्यकर्त्यांमध्ये गोंधळाची अवस्था निर्माण झाली आहे. शरद पवार की अजित पवार निवडावा अशी द्विधा अवस्था निर्माण झाली आहे. याबाबत निलेश लंके यांनी आपले मत मांडले आहे. 

राजकारणात मला काही मिळाले नाही तरी चालेल मात्र पवार परिवार एकसंघ राहिला पाहिजे. धर्मावर, चुकीच्या पध्दतीने काम करणारा पवार परिवार नसून विकासला प्राधान्य देणारा हा परीवार देशाच्या, महाराष्ट्राच्या हितासाठी एक राहिला पाहिजे. मला पवार साहेब, अजितदादा, सुप्रियाताई यांनी निःस्वार्थ प्रेम दिले आहे, त्यांच्यात मी आवड निवड कशी करू, असा सवाल करीत सर्व ठीक होईल कार्यकर्त्यांनी निश्चिंत राहावे, असे आवाहन आमदार नीलेश लंके यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बुथ कमिट्यांचा आढावा घेण्यासाठी मेळाव्यात आ. लंके हे बोलत होते. बुथ कमिट्यांच्या आढाव्याबरोबरच राज्यात रविवारी झालेल्या राजकीय घडामोडींवर या मेळाव्यात चर्चा झाली. यावेळी बोलताना आ. लंके म्हणाले, आपण राष्ट्रवादी काँग्रेससोबतच आहोत. राष्ट्रवादी हा परिवार आहे. पक्षाचे नेते मंडळी पक्ष तुटू देणार नाहीत. नेते कार्यकर्त्यांना वाऱ्यावर आमदार नीलेश लंके यांनी बुथ कमिटी आढावा बैठकीत मार्गदर्शन केले.

मी रडणारा नसून लढणारा आहे. काहीही झाले तरी त्यातून चांगलेच आऊटपुट निघेल. वाईट जरी घडले तरी वाईटातून चांगले घडविण्याची ताकद माझ्याकडे असल्याचे लंके यांनी सांगितले.

Web Title: All three love! How do I select a preference for Nilesh Lanke?

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here