Home पुणे महिलेने कॅप्सूलमधून आणली सोन्याची पेस्ट, विमानतळावर २० लाखांचे सोने जप्त

महिलेने कॅप्सूलमधून आणली सोन्याची पेस्ट, विमानतळावर २० लाखांचे सोने जप्त

Pune: महिलेने सोन्याची पेस्ट कॅप्सूलमध्ये लपवून आणल्याचे आढळून आले, २० लाख रुपयांचे ४२३ ग्रॅम सोने सीमा शुल्क विभागाने (कस्टम) जप्त (Seized).

Woman brings gold paste from capsule, 20 lakh gold seized at airport

पुणे: दुबईहून स्पाइस जेटच्या विमानाने पुण्यात आलेल्या महिला प्रवाशाकडून २० लाख रुपयांचे ४२३ ग्रॅम सोने सीमा शुल्क विभागाने (कस्टम) जप्त केले आहे. महिलेने सोन्याची पेस्ट कॅप्सूलमध्ये लपवून आणल्याचे आढळून आले आहे.

याप्रकरणी ४१ वर्षीय महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एक प्रवासी महिला स्पाइस जेट एसजी ५२ या विमानाने दुबईहून पुणे विमानतळावर आली. या महिलेने विमानतळावरील एक्स-रे तपासणीत प्रकार उघड झाला आहे.

महिलेने शरीराच्या आतील भागात काही वस्तू लपवून आणल्याचा संशय आल्यानंतर कस्टम अधिकाऱ्यांनी महिलेची सखोल चौकशी केली. तिची रुग्णालयात एक्स-रे तपासणी केली असता, तिच्या शरीरात ४२३ ग्रॅमच्या सोन्याची पेस्ट असलेल्या दोन पांढऱ्या कॅप्सूल आढळल्या. ग्रीन चॅनल ओलांडल्यानंतर कस्टम अधिकाऱ्यांना तिच्या हालचाली संशयास्पद दिसून आल्या.

Web Title: Woman brings gold paste from capsule, 20 lakh gold seized at airport

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here