Home महाराष्ट्र अजित पवारांना महसूल खातं दिलं तर चालेल का? राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले…..

अजित पवारांना महसूल खातं दिलं तर चालेल का? राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले…..

Radhakrishna Vikhe Patil:  काल कॅबिनेटची बैठक पार पडल्यानंतर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली.  यावेळी विखे पाटील म्हणाले आजच्या कॅबिनेट बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

Will it work if Ajit Pawar is given a revenue account Radhakrishna Vikhe Patil said

काल कॅबिनेटची बैठक पार पडल्यानंतर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली.  यावेळी विखे पाटील म्हणाले आजच्या कॅबिनेट बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. आता राज्यात ट्रिपल इंजिन सरकार असल्यामुळे विकासाला गती आली आहे. याआधीदेखील अशी गती होती. परंतु आता ट्रिपल इंजिनमुळे गती वाढली आहे. लोकाभिमूक कामं करण्यात आणखी उत्साह आला आहे. नव्या ट्रिपल इंजिन सरकारचं राज्यात स्वागत होत आहे.

राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, आपल्या राज्याला गतीमान करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चांगली कामं करत आहेत. आता अजित पवारही आले आहेत. आता आणखी चांगली कामं होतील, ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

यावेळी विखे पाटील यांना विचारण्यात आलं की, मंत्रिमंडळात खांदेपालट होणार आहे का? मंत्र्यांकडील खाती बदलली जातील का? त्यावर राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले यासंबंधीचे निर्णय मुख्यमंत्री घेतील. तसेच विखे पाटलांना आणखी एक प्रश्न विचारण्यात आला. अजित पवार यांना महसूल खातं दिलं जाईल, असं बोललं जात आहे, असा निर्णय झाला तर तुम्हाला तो मान्य असेल का? या प्रश्नावर विखे पाटील म्हणाले, पक्षश्रेष्ठी घेतील तो निर्णय अंतिम असेल. शेवटी संघटनेत पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतात तो राज्यहिताचा असतो. आम्ही तो अमान्य करण्याचा प्रश्नच येत नाही.

Web Title: Will it work if Ajit Pawar is given a revenue account Radhakrishna Vikhe Patil said

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here