पत्नीने पतीला दुसऱ्या स्त्री सोबत पकडले अन….
Jalgaon Crime : पत्नीनेच पतीला दुसऱ्या स्त्री सोबत पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्याचे समोर आले आहे. पत्नीच्या तक्रारीवरून पोलिसांनी तिच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
जळगाव: पत्नीनेच पतीला दुसऱ्या स्त्री सोबत पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्याचे समोर आले आहे. पत्नीच्या तक्रारीवरून पोलिसांनी तिच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
जामनेर रस्त्यावरील रविराज परमिट रूमला लागून असलेल्या राधाकिशन लॉजिंगमध्ये तुझा पती दुसऱ्या स्त्री सोबत गेला असल्याची माहिती पत्नीला मिळाल्यानंतर तिने नातलगांना सोबत घेऊन पोलिसांना माहिती दिली व त्यांचे सोबत जाऊन बघितले असता राधाकिशन लॉजिंगमध्ये पती दुसऱ्या स्त्रीसोबत दिसून आला.
हे दाम्पत्य भडगाव रोड भागातील उच्चभ्रू वसाहतीत वास्तव्यास असून, दोघेही खासगी स्वरूपाची नोकरी करून उदरनिर्वाह चालवतात. पतीचे दुसऱ्या स्त्रीशी अनैतिक संबंध आहेत, याची पत्नीला कुणकुण लागल्याने ती पतीच्या पाळतीवरच होती.
अखेर एक जुलैला दुपारी दुसऱ्या स्त्रीसोबत पतीला रंगेहाथ पकडून तिने पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा केला असून, ज्या ठिकाणी हा प्रकार घडला त्या ठिकाणी ग्राहक क्वचितच दिसतात. परंतु सकाळपासून सायंकाळपर्यंत महिला, पुरुषांची येथे ये जा दिसत असल्याचे या परिसरातील रहिवासी व शेतकऱ्यांनी सांगितले.
Web Title: Crime revealed that the wife herself caught the husband with another woman and handed him over to the police
See also: Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App