Home अकोले Ambit Dam Overflow: आंबित धरण ओव्हरफ्लो

Ambit Dam Overflow: आंबित धरण ओव्हरफ्लो

Ambit Dam overflow

अकोले | Ambit Dam: मुळा खोऱ्यात मान्सून सक्रीय होऊ लागल्याने या नदीवरील १९३ दशलक्ष घनफूट क्षमतेचा आंबित तलाव शुक्रवारी सकाळी ११ वाजता पूर्ण क्षमतेने भराला आहे, या तलावातून २०० ते ३०० क़ुसेकने नदीत विसर्ग सुरु असल्याची माहिती जलसंपदा विभागाचे अभिजित देशमुख यांनी दिली.

मुळा भंडारदरा पाणलोट क्षेत्रात पाउस सुरु आहे. त्यामुळे शेतीच्या कामाना वेग आला आहे. मागील वर्षी पहिल्याच आठवड्यात  आंबित जलाशय भरला होता. यंदा दोन दिवस उशिरा भरला आहे, जलाशय भरल्याने शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे.

मुळा, भंडारदरा धरणाच्या पाणलोटक्षेत्रात मागील आठवड्यापासून मान्सून सक्रीय होऊ पाहत आहे. पावसात म्हणावा तसा जोर नसला तेरी पावसाच्या सरी बरसू लागल्याने भंडारदरा आणि निळवंडे धरणात संथ गतीने पाण्याची आवक सुरु आहे. भंडारदरा धरणात सकाळी ८८ दशलक्ष घनफूट पाण्याची आवक होत आहे. तर निळवंडे धरणात ६ दशलक्ष घनफूट नवीन पाण्याची आवक झाली आहे.  

Web Title: Ambit Dam overflow

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here