Home अहमदनगर अल्पवयीन प्रेमीयुगुल पोलिसांच्या ताब्यात

अल्पवयीन प्रेमीयुगुल पोलिसांच्या ताब्यात

Shrirampur Juvenile Premiyugul in police custody

श्रीरामपूर | Shrirampur: शहरात संशयास्पद फिरणाऱ्या कराड जि. सातारा येथील एका अल्पवयीन प्रेमीयुगलला पोलिसानी ताब्यात घेण्यात आले आहे. मुलीचे कराड येथून अपहरण झाल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. अल्पवयीन तरुणीला सातारा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

काही दिवसांपूर्वी हे प्रेमीयुगुल मुंबई येथे पळून गेले होते. काही दिवस दादरमध्ये थांबल्यानंतर ते बसने श्रीरामपूरला आले. शहराची पुरेशी माहिती नसल्याने ते संशयास्पद फिरत होते. काही जागरूक नागरिकांना हे प्रेमीयुगुल बेलापूर रस्त्यावर दिसून आल्याने त्यांनी शहर पोलीस पथकाला माहिती कळविली.

पोलिसांनी ताब्यात घेतले आणि चौकशी केली असता कराड तालुक्यातील पोलीस ठाण्यात मुलीच्या अपहरणाचा गुन्हा दाखल असल्याचे समोर आले. तेथील पोलिसांशी संपर्क साधण्यात आला. सातारा पोलिसांनी येथे येऊन प्रेमियुगलास ताब्यात घेतले. अधिक तपास सातारा पोलीस करीत आहे.

Web Title: Shrirampur Juvenile Premiyugul in police custody

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here