Home महाराष्ट्र Amit Thackeray: राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे लिलावती रुग्णालयात दाखल

Amit Thackeray: राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे लिलावती रुग्णालयात दाखल

Amit Thackeray Admitted to Lilavati Hospital

MNS Amit Thackeray News: आज सोमवारी सकाळी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव मनसे नेते अमित ठाकरे यांना वांद्रे येथील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राज्यात करोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत नाही. देशात बाधितांचा आकडा ७५ लाखांच्या वर गेला आहे. याच बरोबर मनसे नेते अमित ठाकरे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मागील दोन दिवसांपासून अमित ठाकरे यांना ताप येत होता. त्यांची करोना चाचणी निगेटिव्ह आलेली आहे. मलेरिया चाचणी देखील करण्यात आली आहे. ती सुद्धा निगेटिव्ह आली आहे. घाबरून जाण्यासारख काही नाही असे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे. खबरदारी म्हणून त्यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

करोना काळात अमित ठाकरे यांनी अनेक भेट गाठी घेतल्या. अंगणवाडी सेविकांच्या मागण्या सरकारकडे मांडल्या. अमित ठाकरे यांनी अपुऱ्या वेतनाबाबत समस्या मांडल्या होत्या.  

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See:  Latest Entertainment News, Ahmednagar News, and  Latest Marathi News Live

Web Title: Amit Thackeray Admitted to Lilavati Hospital

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here