Home अकोले अकोले: अमृतसागरची निवडणूक, आजी – माजी आमदारांचा कस पणाला

अकोले: अमृतसागरची निवडणूक, आजी – माजी आमदारांचा कस पणाला

Akole Amrutsagar Election: निवडणूक अवघ्या दोन दिवसांवर, आजी-माजी आमदारांचा कस, घोडेबाजारच्या शक्यतेने चर्चेला उधाण.

Amrutsagar election, Aji -How did former MLAs fare

अकोले : तालुक्यातील अमृतसागर सहकारी दूध संघाची निवडणूक अंतिम टप्यात असून विजयाचा जादूई आकडा पार करण्यासाठी आजी – माजी आमदारांचा चांगलाच कस लागला आहे.

अमृतसागर दूध संघाची निवडणूक अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. मात्र संचालक होण्यास इच्छुक असलेल्या बहुतांश उमेदवारांना मतदार यादीतील सर उमेदवारांच्या भेटी घेणे शक्य होत नाही. निवडणूक रिंगणातील स्वतः व इतर २९ उमेदवार वगळता उर्वरित १०० मतदारांच्या गाठीभेटी घेणे उमेदवारांसह पदाधिकाऱ्यांनाही शक्य होईल, असेही चित्र दिसत नाही. सद्यस्थितीत मतदार यादीतील एकूण १३० मतदारांपैकी केवळ ५० ते ६० मतदारच तालुक्यात आढळून येत नाहीत, अशी अनेकांची खंत आहे.

घोडेबाजार होण्याच्या शक्यतेने तालुक्यातील चर्चेला उधाण आले आहे. पंधरा जागांसाठी ३० उमेदवार केवळ १३० मते, विजयासाठी एका पॅनला किमान ६६ मतांची गरज अशी स्थिती आहे. ८ जानेवारीस मतदान आहे. कोण कुणाला भेटला, महसूलमंत्री यांना विरोधातील चार- पाच नेते जाऊन भेटले, कशाला भेटले, याची शहानिशा न करता उलट सुलट चर्चा बिनबोभाट होत आहेत.

Business Idea | तुम्हाला तुमचा स्वतः चा बिजनेस सुरु करायचा मग हा व्हिडियो जरूर पहा

निवडणुकीत नगर पंचायत त्यांच्या गळाला लागली. पुढे अगस्ती कारखाना हातातून गेला आता अमृतसागरची लढत रंगली आहे. माजी आमदार वैभव पिचड यांनी संपूर्ण कस लावल्याचे चित्र आहे. त्यांनी आपल्या ठरावीक जुन्या मावळ्यांसह आर्थिक सक्षम उमेदवार सोबत घेऊन लढ्यात जान आणली आहे. तर आमदार डॉ. किरण लहामटे, अगस्तीचे अध्यक्ष सीताराम गायकर, उपाध्यक्ष अशोक भांगरे, काँग्रेसचे मधुकर नवले यांच्यासह महाविकास आघाडी घटक पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.

Web Title: Amrutsagar election, Aji -How did former MLAs fare

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here