Home अहमदनगर दोघा भावांवर तलवार व कोयत्याने हल्ला, सरपंचासह दोघांविरुध्द गुन्हा

दोघा भावांवर तलवार व कोयत्याने हल्ला, सरपंचासह दोघांविरुध्द गुन्हा

Ahmednagar Crime:  पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीचा राग मनात धरून दोघा भावांवर तलवार व कोयत्याने हल्ला करून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न.

Attack on two brothers with sword and mace, crime against both of them along with sarpanch

अहमदनगर: पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीचा राग मनात धरून दोघा भावांवर तलवार व कोयत्याने हल्ला करून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी शहापूरच्या सरपंचासह दोघांविरुध्द भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे.

सोमनाथ भानुदास बेरड व सतीश भानुदास बेरड (दोघेही रा. शहापूर, ता. नगर) हे दोघे भाऊ जखमी झाले आहेत. सरपंच दत्तात्रय भालसिंग व त्यांचा भाऊ संतोष भालसिंग यांना अटक (Arrested) करण्यात आली आहे.

Business Idea | तुम्हाला तुमचा स्वतः चा बिजनेस सुरु करायचा मग हा व्हिडियो जरूर पहा

याबाबत अधिक माहिती अशी की, सोमवारी सायंकाळी शहापूर शिवारात बेरड यांच्या घरात व गावातील खंडोबा मंदिराजवळ ही घटना घडली. जखमी सोमनाथ यांच्या फिर्यादीवरून शहापूरचा सरपंच दत्तात्रेय दिलीप भालसिंग व संतोष दिलीप भालसिंग यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच शहर पोलिस उपअधीक्षक अनिल कातकाडे, सहाय्यक निरीक्षक शिशीरकुमार देशमुख, उपनिरीक्षक एम. के. बेंडकोळी यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी सरपंच दत्तात्रय भालसिंग व त्यांचा भाऊ संतोष भालसिंग यांना अटक केली आहे. अधिक तपास उपनिरीक्षक बेंडकोळी करीत आहेत.

Web Title: Attack on two brothers with sword and mace, crime against both of them along with sarpanch

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here