Home Accident News अहमदनगर: दुचाकीच्या अपघातात एकाचा मृत्यू

अहमदनगर: दुचाकीच्या अपघातात एकाचा मृत्यू

Ahmednagar Rahata Accident:  दुचाकीच्या अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची घटना.

One died in a two-wheeler accident

राहता:  राहाता तालुक्यातील पिंपरी निर्मळ येथील कैलास ज्ञानदेव घोरपडे (वय 45) यांचा कोर्‍हाळे येथे दुचाकीच्या अपघातामध्ये मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

पिंपरी निर्मळ येथील कैलास घोरपडे हा तरुण गोदरेज पोल्ट्री कंपनीकडे नोकरीस होता. पोहेगाव येथील शेतकर्‍यांची मिटींग आटोपून शिर्डी-राहाता बाह्यवळण ररस्त्याने तो पिंपरी निर्मळ येथील घरी एमएच 17.एक्यु.1447 या दुचाकीवरून प्रवास करत होता. अंधार पडल्याने कोर्‍हाळे येथील वळणावर समोरून येणार्‍या गाडीच्या लाईट चमकल्याने साईड गटारात गाडी पडली.

Business Idea | तुम्हाला तुमचा स्वतः चा बिजनेस सुरु करायचा मग हा व्हिडियो जरूर पहा

मात्र त्या खड्ड्यात चिखल पाणी असल्याने व डोक्यात हेलमेट असल्याने त्यामध्ये चिखल व पाणी जाऊन गुदमरून कैलासचा दुर्दैवी मृत्यू झाला. पिंपरी निर्मळ येथील सामाजिक व धार्मिक कार्यात सहभागी असणार्‍या व हसतमुख असणार्‍या कैलासच्या अपघाती निधनाने गावावर शोककळा पसरली आहे.त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई, बंधू, बहिणी असा परीवार आहे. अरुण घोरपडे यांचे ते धाकटे बंधू होत.

Web Title: One died in a two-wheeler accident

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here