Home क्राईम साखरपुडा झाला अन बोहल्यावर चढण्याआधीच होणाऱ्या बायकोचा गळा चिरला

साखरपुडा झाला अन बोहल्यावर चढण्याआधीच होणाऱ्या बायकोचा गळा चिरला

Jalna Crime News:  लग्नाच्या आधीच आपल्या होणाऱ्या बायकोचा गळा चिरून खून (Murder) केल्याची घटना.

an accident and the wife's throat was cut before climbing Murder

जालना: जालन्यातील मंठा तालुक्यातील बेलोरा तांड्यावर धक्कादायक घटना समोर आली आहे. १५ दिवसांपूर्वी साखरपुडा झालेल्या तरुणाने, बोहल्यावर चढण्याआधीच आपल्या होणाऱ्या बायकोचा गळा चिरून खून (Murder) केल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.  हत्या करून तरुण फरार झाला आहे. शनिवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास घटना घडली.  मयत सपना ऊर्फ दीप्ती संदीप जाधव ही अल्पवयीन असल्याचं समोर आले आहेत. तर सुशील पवार असे संशयित आरोपीचे नाव आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की,  मंठा तालुक्यातील बेलोरा तांडा येथील सपना संदीप जाधव (वय 17 वर्षे) हीच विवाह बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील वरूड येथील सुशील पवार या तरुणासोबत ठरला होता. सर्वकाही बोलणं झाल्यावर 15 दिवसांपूर्वीच सपना आणि सुशील दोघांचा साखरपुडा झाला. दरम्यान दोन्ही कुटुंबातील सदस्यांनी ठरवल्याप्रमाणे शनिवारी मुलाकडील आणि मुलीकडील मंडळी लोणार येथे बस्ता बांधण्यासाठी गेले होते. यावेळी सुशील देखील बस्ता खरेदी करण्यासाठी गेला होता.

मुलाकडील आणि मुलीकडील मंडळी बस्ता खरेदी करत असतानाच, सुशील तेथून थेट बेलोरा तांडा येथे गेला. यावेळी सपना घरी एकटीच होती. घरी गेल्यावर त्याने सपनावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला आणि दोघांमध्ये बाचाबाची झाली.  त्यातूनच त्याने सोबत आणलेल्या चाकूने गळा चिरून सपनाची हत्या केली. घरात असलेल्या लहान मुलांनी याबाबत तत्काळ ग्रामस्थांना माहिती दिली. मात्र तोपर्यंत संशयित आरोपी सुशील फरार झाला होता. तर गावकऱ्यांनी याची माहिती पोलिसांना दिली, माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.

Web Title: an accident and the wife’s throat was cut before climbing Murder

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here