Home महाराष्ट्र अकरावीत शिक्षण घेणाऱ्या प्रेमीयुगुलांचे विहिरीत मृतदेह आढळल्याने खळबळ

अकरावीत शिक्षण घेणाऱ्या प्रेमीयुगुलांचे विहिरीत मृतदेह आढळल्याने खळबळ

Latur News Dead bodies of lovers studying in class 11 were found in a well: दहावी आणि अकरावीत शिक्षण घेणाऱ्या प्रेमीयुगुलांचे मृतदेह चिंचोली बल्लाळनाथ शिवारातील एका विहिरीत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

Dead bodies of lovers studying in class 11 were found in a well

लातूर: लातूरमधून एक धक्कादायक खळबळजनक बातमी समोर आली आहे. इयत्ता दहावी आणि अकरावीत शिक्षण घेणाऱ्या प्रेमीयुगुलांचे मृतदेह चिंचोली बल्लाळनाथ शिवारातील एका विहिरीत आढळून आलेत. मुलीचा मृतदेह पाण्यावर तरंगताना शुक्रवारी आढळला. तर मुलाचा मृतदेह शनिवारी पोलिसांनी शोधून काढला. तो विहिरीतील गाळात अडकला होता.

अधिक माहिती अशी की, लातूर शहरानजीक असलेल्या वसवाडी परिसरात १५ वर्षीय मुलगी आपल्या कुटुंबियांसोबत राहत होती. ती इयत्ता १० वीमध्ये लातुरमधील एका शाळेत शिक्षण घेत होती. तर मृत मुलगा मूळचा केज तालुक्यातील असल्याची माहिती मिळाली आहे.

मुलगी १५ फेब्रुवारी रोजी नेहमीप्रमाणे शाळेला जाते असं सांगून घराबाहेर पडली. रोज दुपारी १ वाजता ती घरी येत असे. मात्र १५ तारखेला ती घराकडे परतलीच नाही. तिच्या कुटुंबियांनी तिला सर्वत्र शोधलं. मात्र ती कुठेही सापडली नाही. कुटुंबियांची चिंता वाढू लागली त्यामुळे त्यांनी,याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात मुलगी हरवल्याची तक्रार दिली. शुक्रवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास चिंचोली बल्लाळनाथ शिवारातील एका विहिरीत मुलीचा मृतदेह (Dead body) पाण्यावर तरंगताना आढळून आला. याने गावात एकच चर्चा सुरू झाली.

विहिरीच्या काठावर मुलाची चप्पल मिळाली. पोलिसांनी संशय व्यक्त करत विहिरीत मुलाच्या मृतदेहाचा शोध सुरू केला. मात्र शुक्रवारी पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही. त्यामुळे शनिवार सकाळपासूनच पुन्हा शोध मोहीम सुरू केली. अखेर सायंकाळी ५ वाजता मुलाचाही मृतदेह पोलिसांना पाण्याबाहेर काढण्यात यश आले. असे गातेगाव ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक किशोर कांबळे म्हणाले. मुलांच्या कुटुंबीयांना शोक अनावर झाला आहे.

Web Title: Dead bodies of lovers studying in class 11 were found in a well

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here