Home संगमनेर अज्ञात वाहनाच्या धडकेत मोटारसायकलस्वार जागीच ठार

अज्ञात वाहनाच्या धडकेत मोटारसायकलस्वार जागीच ठार

An Autorickshaw Driver Killed In An Unknown Vehicle

संगमनेर : तालुक्यातील डोळासणे शिवारात पूणे – नाशिक राष्ट्रीय महामार्गांवरील माहुली घाटात अज्ञात वाहनाने मोटारसायकलस्वारास जोराची धडक दिल्याने तो जागीच ठार झाल्याची घटना मंगळवार दि.२५ जून रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली. समाधान विनायक बागुल (वय ३०, रा. सोनजांब, ता. दिंडोरी, जि. नाशिक ) असे अपघातात ठार झालेल्या तरूणाचे नाव आहे.

या बाबत घारगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी, नाशिक जिल्ह्यातील सोनजांब येथील समाधान बागुल हे मोटारसायकलवरून (क्र. एमएच १५ बीओ ३७५२) संगमनेर मार्गे पुण्याच्या दिशेने जात होते. ते बुधवारी रात्री साडेआकरा वाजेच्या सुमारास पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील माहुली घाटात आले असता त्यांच्या मोटारसायकलला अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. त्यामुळे बागुल हे जागीच ठार झाले. अपघात इतका भयानक होता की. त्यांच्या अंगावरून गाड्या जावून मृतदेहाचा अक्षरश: चेंदामेंदा झाला होता. घटनेची माहिती समजताच घारगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती आणि बागुल यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णवाहिकेतून संगमनेर कुटीर रुग्णालयात आणण्यात आला होता. याप्रकरणी संदीप भीमराव निकम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून घारगाव पोलिसांनी अज्ञात वाहन चालकांविरुद्ध गु. र. नं. १६५/२०१९ भा. दं. वि. कलम २७९,३०४(अ) ३३८, ४२७, मोटार वाहन कायदा अधि १८४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अंबादास भुसारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल आदिनाथ गांधले हे करीत आहेत.

Website Title : An Autorickshaw Driver Killed In An Unknown Vehicle

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here