Home अकोले अकोलेत बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेळ्या ठार

अकोलेत बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेळ्या ठार

अकोले : शहरातील धामणगाव आवारी रस्त्यावर असलेल्या सूर्यभान सुदाम नाईकवाडी यांच्या गोठ्यात अंधाराचा फायदा घेऊन रात्री दीड वाजण्याच्या सुमारास शेजारील डाळिेंबाच्या बागेत दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला चढवून दोन गाभण शेळ्यांना जागीच ठार केले. त्यामधील एक शेळी बिबट्याने जवळ असणाऱ्या ऊसाच्या शेतात ओढून नेली व दुसरी जागेवर ठार मारली. यामुळे संबंधित शेतकऱ्यांचे २० हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.

 घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आल्यानंतर वनरक्षक श्री. कोरडे यांनी घटनास्थळी जाऊन प्रत्यक्ष पंचनामा केला. बिबट्याच्या दहशतीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, वनविभागाने तातडीने दखल घेऊन येथे पिंजरा लावण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

Website Title : Two Goats Killed In Akola  Leopard Attack

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here