Home संगमनेर पिण्याचे पाणी व मुलभूत सुविधांआभावी संतप्त महिलांचे घुलेवाडी ग्रामपंचायतीला टाळे

पिण्याचे पाणी व मुलभूत सुविधांआभावी संतप्त महिलांचे घुलेवाडी ग्रामपंचायतीला टाळे

संगमनेर: शहराजवळ असणाऱ्या घुलेवाडीतील साईश्रद्धा चौक, प्रभाग क्रमांक एकमध्ये नागरिकांना पिण्याचे पाणी आणि मुलभूत सुविधा मिळत नसल्याने संतप्त झालेल्या महिलांसह नागरिकांनी  आखेर आंदोलन करीत आज सकाळी ग्रामपंचायतीला टाळे ठोकले. दरम्यान सरपंच सोपान राऊत यांनी लेखी  आक्ष्वासन  दिल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले.

 घुलेवाडी ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये असलेला साईश्रद्धा चौक, प्रभाग क्रमांक एकमधील नागरिकांना पिण्याचे पाणी, रस्ते, गटारी याकडे ग्रामपंचायतीने लक्ष दिलेले नाही. अखेर संतप्त झालेल्या महिलांसह नागरिकांनी आंदोलन करीत ग्रामपंचायतीला टाळे ठोकण्याचा पवित्रा घेतला. आज ग्रामपंचायतीला टाळे ठोकले असल्याची माहिती  शहर पोलीस ठाण्याला समजताच पोलीस कर्मचारी राजू गायकवाड, बाळासाहेब यादव, आयुब शेख, गाडेकर, साई तळेकर यांनी तात्काळ घुलेवाडीत धाव घेत ग्रामस्थांची समजूत घालत ग्रामपंचायत प्रशासनाशी  चर्चा घडवून आणली. त्यानंतर पोलिसांनी ग्रामपंचायतीचे टाळे उघडले. दरम्यान, येत्या सहा महिन्यांमध्ये साईश्रद्धा चौक आणि आसपासच्या परिसरात पिण्याचे पाणी, रस्ते, गटारींचे काम पूर्ण करण्याचे लेखी आक्ष्वासन सरपंच सोपान राऊत यांनी दिले. तसेच काम करण्याची खूप इच्छा आहे. मात्र ग्रामसेवक तत्पर राहत नसल्याची तक्रारही सरपंच राऊत यांनी केली. त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी  आपले आंदोलन मागे घेतले­­.

Website Title : Gram Panchayat Avoided The Problem Of Drinking Water And Incompetence Of Women With The Help Of Basic Amenities

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here