Home महाराष्ट्र ब्रेकिंग: अनिल देशमुख यांचा जामीन फेटाळला, मुक्काम तुरुंगातच

ब्रेकिंग: अनिल देशमुख यांचा जामीन फेटाळला, मुक्काम तुरुंगातच

Anil Deshmukh's bail rejected, stay in jail

मुंबई  | Anil Deshmukh: राज्याचे माजी गृहमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख  यांचा जामीन मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपाप्रकरणी त्यांना अटक करण्यात आलेली आहे. राज्याचे माजी गृहमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी जामीनासाठी मुंबई सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता त्या अर्जावरती आज मुंबई सत्र न्यायालयामध्ये सुनावणी दिली त्यांचा जामीन न्यायालयाकडून फेटाळण्यात आला आहे.

मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी ईडीने अनिल देशमुख यांना पाच वेळा समन्स बजावले होते. परंतु, अनिल देशमुख ED समोर हजर राहिले नव्हते. त्यामुळे त्यांच्या नावाने लूक आऊट नोटीस जारी करण्यात आलं होतं. दरम्यान ते १ नोव्हेंबर २०२१ रोजी ईडीच्या कार्यालयात ते हजर झाले. त्यावेळी त्यांची १२ तास चौकशी करण्यात आली. या चौकशीनंतर त्यांना ईडीने अटक केली होती.

अंमलबजावणी संचालनालयाने दाखल केलेल्या ५००० पानी पुरवणी आरोपपत्रानंतर अनिल देशमुखांतर्फे विशेष पिएमएलए कोर्टात जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. या जामिन अर्जावर मुंबई सत्र न्यायालयात आज सुनावनी झाली. न्यायालयाने अनिल देशमुखांचा जामीन फेटाळून लावला अनिल देशमुख सध्या आर्थररोड तुरूंगात आहेत

Web Title: Anil Deshmukh’s bail rejected, stay in jail

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here