Home Accident News Accident: स्विफ्ट कारने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार ठार

Accident: स्विफ्ट कारने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार ठार

Shrigonda Accident Two-wheeler killed in Swift car crash

Ahmednagar News Live | Shrigonda Accident | श्रीगोंदा:  स्विफ्ट कारने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना काल दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात आढळगाव येथील मच्छिंद्र भगवान काळे वय वर्षे ४० यांचा:मृत्यू झाला.

स्विफ्ट गाडीने मोटरसायकलला धडक दिल्याने जागीच मृत्यू झाला आहे. काष्टी येथील न्यू लोकसेवा हॉटेल समोर स्विफ्ट क्रमांक एम एच ४२ बीबी ३१९८ या गाडीच्या चालकाने हयगईने गाडी चालवून समोरून मोटरसायकलवर येणार्‍या मच्छिंद्र काळे यांच्या मोटरसायकलला जोराची धडक दिल्याने  अपघात घडला. या अपघातात मच्छिंद्र काळे यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

याबाबत संजय मोहन काळे आढळगाव यांनी श्रीगोंदा पोलीस स्टेशनला खबर दिली. याप्रकरणी स्विफ्ट कार अज्ञात चालकावर श्रीगोंदा पोलीस ठाण्यात भांदवी ३०४(अ), मोटर वाहन नियम २७९, १८८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास श्रीगोंदा पोलीस करीत आहे.

Web Title: Shrigonda Accident Two-wheeler killed in Swift car crash

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here