Home अहमदनगर अण्णा हजारेंचे आश्वासन: दिल्लीत जागा मिळाल्यास शेवटच आंदोलन

अण्णा हजारेंचे आश्वासन: दिल्लीत जागा मिळाल्यास शेवटच आंदोलन

Anna Hazare assurance in Delhi the agitation 

अहमदनगर: दिल्लीमधील शेतकरी आंदोलकांच्या मुलांनी अण्णा हजारेंची भेट घेतली. त्यानंतर दिल्लीत जागा मिळायला हवी, रामलीला किंवा जंतरमंतर येथे जागा मिळाल्यास शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शेवटचे आंदोलन करणार असे त्यांनी आश्वासन दिले आहे.

दिल्लीतील शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनास अण्णा हजारेनी अगोदरच पाठींबा दिला आहे. भारत बंदला पाठींबा देतानी राळेगण सिद्धी येथे महात्मा गांधी पुतळ्यासमोर एक दिवसीय उपोषण केले होते.

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर दिल्लीत जंतरमंतर किंवा रामलीला येथे जागा मिळाल्यास आपण शेवटचे आंदोलन करणार असल्याचे आश्वासन त्यांनी मूळगावी राळेगण सिद्धी येथे दिल्लीतील शतकरी मुलांना दिले आहे. दिल्लीतील शेतकरी पुत्रांनी अण्णा यांची भेट घेतली. जागा मिळाल्यास शेवटचे आंदोलन करणार असे त्यांनी सांगितले. मोदी सरकारने दिलेले लेखी आश्वासन पाळले नाही असेही त्यांनी यावेळी सांगितले.  

शेतकरी आंदोलनात हिंसा नाही, अहिंसेच्या मार्गाने आंदोलने सुरु आहेत. पाच वेळेस बैठका घेऊनही काही तोडगा निघालेला नाही. लेखी आश्वासने मान्य केली नाहीत. आता कृषी मंत्री आश्वासने पूर्ण करतील का असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

Web Title: Anna Hazare assurance in Delhi the agitation 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here