Home संगमनेर संगमनेर शहरातील नावाजलेले सुवर्ण व्यावसायिकाची आत्महत्या

संगमनेर शहरातील नावाजलेले सुवर्ण व्यावसायिकाची आत्महत्या

Suicide of a well-known gold trader in Sangamner 

संगमनेर | Sangamner: शहरातील नावाजलेले सुवर्ण व्यावसायिक म्हणून ओळख असलेल्या मेन रोडवरील मैड ज्वेलर्सचे संचालक ऋषिकेश शिवाजी मैड यांनी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

घुलेवाडी शिवारातील सहकारी सोसायटीत रविवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.  

शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या व्यावसायिकाने आत्महत्या का केली याचे नेमके कारण समजू शकले नाही. याप्रकरणी अधिक तपास पोलीस नाईक निलेश धादवड हे करीत आहे.

ऋषिकेश मैड यांनी प्रसाद हॉटेलमागील सहकारी सोसायटीत असणाऱ्या आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांना शहरातील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले होते, मात्र त्याअगोदरच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. शहरातील एक नावाजलेले सुवर्ण व्यावसायिक म्हणून त्याची ओळख होती. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: Suicide of a well-known gold trader in Sangamner 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here