Home महाराष्ट्र महाविकास आघाडी सरकार म्हणजे चलती का नाम गाडी, थांबली तर खटारा: अण्णा...

महाविकास आघाडी सरकार म्हणजे चलती का नाम गाडी, थांबली तर खटारा: अण्णा हजारे

Anna Hazare News tika on State Government 

मुंबई: राज्यातील महाविकास आघाडीवर जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी जोरदार टीका केली आहे. एबीपी माझा च्या माझा कट्टा या कार्यक्रमात संवाद साधताना अण्णा हजारे यांनी टीका केली. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार म्हणजे चलती का नाम गाडी, थांबली तर खटारा अशी परिस्थिती आहे असा टोला लगाविला.

लोकायुक्तांच्या नियुक्ती कायद्यासाठी मी राज्यसरकारमधील अनेक मंत्र्यांना पत्र लिहिली. मात्र मुख्यमंत्री वगळता कोणीही पत्राला उत्तर दिले नाही. असे अन्ना हजारे यांनी सांगितले.

यावेळी अण्णा हजारे यांनी राज्य सरकारच्या कारभारावर टीका केली. ते म्हणाले ठाकरे सरकार म्हणजे चलती का नाम गाडी, थांबली तर खटारा असा कारभार सुरु आहे. लोकायुक्त कायद्याबाबत मुख्यमंत्री वगळता इतर मंत्र्यांकडून प्रतिसाद मिळाला नाही. मुख्यमंत्री यांनी देखील करोनानंतर पावले उचलू असे सांगितले. लोकायुक्त कायदा न झाल्यास पुन्हा आंदोलन पुकारणार असा इशाराही त्यांनी दिला आहे.   

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See: Ahmednagar News, and  Latest Marathi News Live

Web Title: Anna Hazare News tika on State Government 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here