Home Uncategorized नगर जिल्ह्यात एकाच या गावात ४४ रुग्ण, भजन कार्यक्रम फटका

नगर जिल्ह्यात एकाच या गावात ४४ रुग्ण, भजन कार्यक्रम फटका

44 Corona patients in this village in Nagar district

नगर: कोजागिरी पोर्णिमा कार्यक्रमनिमित्त भजनच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याने गावाला चांगलाच फटका बसला आहे. गावातील ४४ जणांना करोनाची लागण झाली आहे. अद्याप अजून १२८ अहवाल येणे बाकी आहे. आज पुन्हा तपासणी करण्यात येणार आहे.

अकोळनेर या गावात सर्व व्यवहार ठप्प ठेवण्यात आले आहे. गावातील सर्व लोकांची तपासणी करण्यात येणार आहे.काल केलेल्या तपासणीत ४४ बाधित आढळून आले आहेत/ १२८ अहवाल प्रतीक्षेत आहेत. गावातील सर्वच लोकांची तपासणी करण्याचे नियोजन आहे अशी माहिती सरपंच सविता मेहेत्रे यांनी दिली आहे.

कोजागिरी पोर्णिमा निमित्त गावात भजनाचा कार्यक्रम होता. यासाठी गावातील वृद्ध मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती. मागील तीन दिवसांत लोकांना त्रास जाणवू लागल्याने त्यांची तपासणी करण्यात आली आहे. अकोळनेर हे गाव नगर शहरापासून जवळच अंतरावर आहे. यामुळे नगर शहरात देखील रुग्ण वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आता कमी झालेली रुग्ण संख्या आता पुन्हा जिल्ह्याची डोकेदुखी वाढणार असल्याचे वाटत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.  

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See: Ahmednagar News, and  Latest Marathi News Live

Web Title: 44 Corona patients in this village in Nagar district

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here