Home अकोले अकोले तालुक्यात प्रेमीयुगलांची गळफास घेऊन आत्महत्या

अकोले तालुक्यात प्रेमीयुगलांची गळफास घेऊन आत्महत्या

Suicide by hanging of a couple in Akole taluka

अकोले: अकोले तालुक्यातील आंबड या गावात सुतारदरा येथे घनदाट जंगलात एका प्रेमीयुगलांनी आत्महत्या केल्याचे आज उघडकीस आले आहे.

आंबडपासून दोन ते तीन किलोमीटर अंतरावरती सुतारदरा येथे स्थानिक मुले सीताफळ काढण्यासाठी गेले असता त्यांना डोंगर माथ्यावरती एक युवक आणि युवती स्कार्पच्या सहायाने झाडाला लटकलेले दिसले. हे दोघे गळफास लावून एकमेकांच्या अगदी जवळ एकाच झाडाला लटकले होते. तब्बल दहा ते बारा दिवसांपासून हे मृतदेह या ठिकाणी असल्याचे दिसून येत आहे. मृतदेह कुजण्यास सुरवात झाली आहे. त्यामधून उग्र वास येत आहे. या घटनेची माहिती या मुलांनी गावाचे पोलीस पाटील यांना दिली. त्यानंतर तत्काळ घटनास्थळी दाखल होऊन सदर घटनेची शहानिशा केली. याबाबत पोलीसाना माहिती देऊन घटनास्थळी बोलाविण्यात आले. घटनास्थळी पोलीस निरीक्षक अरविंद जोंधळे यांनी भेट दिली आहे. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने त्यांची ओळख पटणे अवघड झाले आहे. परंतु हे मृतदेह कमी अंतरावर गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आल्याने याबाबत परिसरात चर्चा रंगू लागली आहे.

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See: Ahmednagar News, and  Latest Marathi News Live

Web Title: Suicide by hanging of a couple in Akole taluka

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here