Home अकोले अकोल्यात दुष्काळ जाहीर करा अन्यथा भंडारदरा, निळवंडेतून पाण्याचा एकही थेंबसोडू देणार नाही:...

अकोल्यात दुष्काळ जाहीर करा अन्यथा भंडारदरा, निळवंडेतून पाण्याचा एकही थेंबसोडू देणार नाही: आ.पिचड

अकोल्यात दुष्काळ जाहीर करा अन्यथा भंडारदरा, निळवंडेतून पाण्याचा एकही थेंबसोडू देणार नाही: आ.पिचड

अकोले: तालुक्यासाठी दुष्काळ जाहीर करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने चुकीचे धोरण व नियमावली अवलंबली आहे. त्यामुळे अकोले तालुक्याचा दुष्काळात समावेश नाही. अकोले तालुक्याचा दुष्काळी तालुक्यात समावेश करावा नाहीतर भंडारदरा निळवंडे धरणातून पाण्याचा एक थेंबही सोडू देणार नाही असा इशारा आमदार वैभवराव पिचड यांनी दिला. यासाठी सोमवारी दि. 22 ऑक्टोबर रोजी  अकोले तहसील कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाचे नियोजन अमृतसागर दूध संघाच्या सभागृहात राष्ट्रवादी सर्व कार्यकर्त्यांची बैठक झाली यावेळी राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

You May Also LikeSalman Khan upcoming movies 2018 and 2019 

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आ. पिचड म्हणाले केंद्र व राज्य शासनाने दुष्काळ जाहीर करताना चुकीची नियमावली अवलंबली आहे. त्यामुळे अकोले तालुक्याचा दुष्काळी तालुक्यामध्ये समावेश केला गेला नाही. त्यामुळे अकोले तालुक्यातील जनतेवर मोठा अन्याय झाला आहे. तालुक्यामध्ये सरासरी सरासरी पर्जन्यमान गृहीत धरल्यामुळे अकोले तालुक्याची वेगळी स्थिति निर्माण झाली. प्रत्यक्षात मात्र भंडारदरा व हरिश्चंद्र परिसरात जास्त पाऊस पडतो हे जरी खरे असले तरी हे सर्व पानी खाली धरणात वाहून जाते. तालुक्याच्या कोरडवाहु भागात कमी पाऊस पडलेला आहे. आदिवासी भागात जास्त पाऊस झालेला असला तरी परतीचा  पाऊस न झाल्यामुळे भात पिके नष्ट झाली आहे. वीजेणे तर शेतकर्‍यांची दयनीय अवस्था झालेली आहे. रस्त्यांची अवस्था एकदम खराब झालेली आहे. यासंबंधी जिल्हाधिकारी व पालक मंत्री यांच्याकडे वारंवार मागणी करूनही जाणीवपूर्वक अकोले तालुक्याला वंचित ठेवले आहे. म्हणून पीक पाहणी करून शेतकर्‍यांना दिलासा द्यावा. अकोले तालुका दुष्काळी जाहीर करावा या मागणीसाठी सोमवार दि. 22 ऑक्टोबर रोजी सर्व नागरिकांनी व शेतकर्‍यांनी मोर्चामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन आ. पिचड यांनी केले.


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.  किवा आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.


आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजच संपर्क करा. 9850540436


मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा


 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here