Home अहमदनगर क्रांती सेना जामखेड तालुका अध्यक्षपदी काकडे

क्रांती सेना जामखेड तालुका अध्यक्षपदी काकडे

क्रांती सेना जामखेड तालुका अध्यक्षपदी काकडे

जामखेड :  येथील दत्तात्रय काकडे यांची क्रांती सेनेच्या जामखेड तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.या निवडीचे पत्र प्रदेश संपर्क प्रमुख मधुकर म्हसे यांनी दिले.
     क्रांती सेना महाराष्ट्र ही संघटना सामाजिक कार्य करत असुन या संघटनेची स्थापना मा. आ. शालिनीताई पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अस्तित्वात आलेली आहे. या संघटनेचा महत्वाचा उद्देश अन्याय विरोधात लढा व चळवळ करण्याचे काम केले जाते. आर्थिक दुर्बलांसाठी लढा देणे, आरक्षण गुणवत्तेस मारक असल्याने आर्थिक निकषाचे आरक्षण मिळविणे, कामगार, शेतकरी, विद्यार्थी, शिक्षक, आरोग्य आदी विषयावर पक्ष बांधणी करणे, विभागवार समस्यांवर लढा उभारणे व त्यास न्याय देणे  तसेच महाराष्ट्रात तळागळापर्यंत अन्याय विरुद्ध लढण्याचे कामकाज पक्ष संघटनेकडून केले जाते.
    या निवडीनंतर क्रांती सेना महाराष्ट्र या पक्ष संघटनेचे अध्यक्ष मा. आ. शालिनीताई पाटील , प्रदेश अध्यक्ष मा. संतोष तांबे, प्रदेश सरचिटणीस नितीन देशमुख, प्रदेश संपर्क प्रमुख मधुकर म्हसे पाटील, शिक्षक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष भागचंद औताडे सर,शेतकरी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष प्रतापसिंह पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष सुभाष चाटे, प्रदेश संघटक शहाजी कोळपे, मराठवाडा अध्यक्ष रघुनाथ भोसले, कृष्णा सावंत, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष महेश शिंदे, पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष संदीप ओहोळ, जिल्हा अध्यक्ष जालिंदर शेडगे,द.नगर उपाध्यक्ष अविनाश कुरूमकर, कार्याध्यक्ष सुभाष दरेकर,उ.नगर उपाध्यक्ष अजित गुंजाळ, संदीप त्र्यंबके, युवा क्रांती सेना अध्यक्ष शब्बीर शेख, उपाध्यक्ष शेखर पवार आदींनी अभिनंदन केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.  किवा आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.


आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजच संपर्क करा. 9850540436


मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा



LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here