Home महाराष्ट्र मुंबईतील ताज हॉटेलमध्ये बॉम्ब असल्याचा निनावी फोन: बॉम्बपथक दाखल

मुंबईतील ताज हॉटेलमध्ये बॉम्ब असल्याचा निनावी फोन: बॉम्बपथक दाखल

anonymous phone call

मुंबई: मुंबईतील प्रसिद्ध हॉटेल ताजमध्ये बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन पोलिसांच्या कंट्रोल रूमला आल्याने तातडीने पोलीस आणि बॉम्ब पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूमला दुपारच्या सुमारास एक निनावी फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने हॉटेल ताजमध्ये बॉम्ब ठेवल्याचे म्हंटल. त्यानंतर तत्काळ पोलीस आणि बॉम्ब पथक ताज हॉटेल परिसरात दाखल झाले. हॉटेल ताज परिसरात पोलिसांकडन तपास व शोध मोहीम सुरु आहे.

काही दिवसांपूर्वी मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन कंट्रोल रूमला आला होता. त्यानंतर बीबीडीएस आणि पोलिसांच्या पथकाने संपूर्ण मंत्रालय आणि परिसरात तपास केला. मात्र, हा एक बनावट कॉल असल्याचं उघड झालं होत. तसेच हा फोन नागपुरातून आल्याचंही तपासात समोर आलं होतं.

Web Title: anonymous phone call about the bomb at the Taj Hotel

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here