संगमनेर: बनावट दारूप्रकरणी आणखी एका मुख्य सूत्रधाराला अटक
Sangamner News: रायतेवाडी येथे पकडण्यात आलेला बनावट दारू साठ्या संदर्भात आज सुरेश कालडा याच्या भावाला अटक (Arrested).
संगमनेर: संगमनेर तालुक्यातील रायतेवाडी येथे पकडण्यात आलेला बनावट दारू साठ्या संदर्भात आज सुरेश कालडा याच्या भावाला अटक करण्यात आली आहे. त्याला न्यायालयाने तीन दिवसाचे पोलिस कोठडी सुनावली.
संगमनेर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी तर अकोले येथे कालडाचे परमिट रूम आहे. दोन्ही तालुक्यात कालडाने बनावट दारूच्या विक्रीतून मोठी माया गोळा केल्याचे आता उघड होत आहे. १५ ऑगस्ट रोजी भल्या पहाटे येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाला माहिती मिळाल्याने त्यांनी रायते येथे सुरेश कालडा यांचा जोडीदार चैतन्य मंडलिक यांच्या घरावर कारवाई करत बनावट दारूच्या गोवा राज्यातील दारू, बाटल्यांचे बनावट बुच व कालडाची हुंडाई कार असा पंधरा लाखाचा मुद्देमाल जप्त केला होता. राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेली ही कारवाई संगमनेर तालुक्यातील सर्वात मोठी मानली जात आहे. याचे नागरिकांनी लावावे, अशी अपेक्षा नागरिकांतून होत आहे.
स्वागतही केले. दरम्यान, चैतन्य सुभाष मंडलिक व सुरेश मनोजकुमार कालडा यांची शनिवारी पोलिस कोठडी संपली होती. पकडण्यात आलेल्या दोघांनी पोलिसांनी कोठडी दरम्यान शिवा मनोजकुमार कालडा याचे नाव सांगितले. कालडा संगमनेर अकोले तालुक्यात बनावट दारूचे मोठे रॅकेट चालवत असल्याचे आता बोलले जात आहे. दरम्यान, सुरेश कालडा याने स्वतःच्या भावाचे शिवाकुमार मनोजकुमार कालडा याचे नाव सांगितल्याने येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाने शिवा कालडाला शनिवारी सकाळी ताब्यात घेतले. त्याला न्यायालयाने तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनालली. काही वर्षांपूर्वी राज्य उत्पादन शुल्क विभागाने संगमनेर तालुका हद्दीत गोवा स्थित दारूच्या ट्रक पकडल्या होत्या. मात्र त्याची शहानिशा अद्यापही झाली नाही. घटनेत या कारवाईत कालडाचे नाव पुढे आले होते. तपास न लागल्याने त्या ट्रक वर्षानुवर्षे उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयासमोर उभे होत्या. आता हे बनावट दारूचे प्रकरण कायमस्वरूपी मार्गी लावावे अशी नागरिकांची मागणी आहे.
Web Title: Another main facilitator arrested in fake liquor case