Home अहमदनगर शिर्डी श्री साईबाबा संस्थान अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या आमदाराची नियुक्ती

शिर्डी श्री साईबाबा संस्थान अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या आमदाराची नियुक्ती

Appointment of NCP MLA as President of Shirdi Shri Saibaba Sansthan

शिर्डी: शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थानचे अध्यक्षपद राष्ट्रवादी कॉंग्रेसला (President of Shirdi Shri Saibaba Sansthan) तर पंढपूरच्या श्री विठ्ठल रुख्मिणी देवस्थानाचे अध्यक्षपद कॉंग्रेसला देण्यात येणार आहे. मुंबईतील सिद्धिविनायक ट्रस्टचे अध्यक्षपद शिवसेनेकडे कायम असणार आहे. मंगळवारी महाविकास आघाडीच्या समन्वय समितीच्या बैठकीत याबाबत मंडळाचे वाटपाचे सूत्र निश्चित करण्यात आल्याची खात्रीलायक माहिती दिली आहे. १५ वर्ष शिर्डी संस्थान अध्यक्षपद कॉंग्रेसकडे होते तर पंढपुरचे राष्ट्रवादीकडे मात्र त्यात पहिल्यांदाच बदल करण्यात आला आहे.

शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थानच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांची तर उपाध्यक्षपदी शिवसेनेचे माजी आमदार मिर्लेकर यांची नियुक्ती करण्याचा निर्णय झाला. पंढरपूर संस्थानचे अध्यक्ष आणि विश्वास्थांची नावे, कोणत्या पक्षाला किती पदे द्यायची हे विधिमंडळाच्या अधिवेशन नंतर ठरविण्यात येणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले.  

Web Title: Appointment of NCP MLA as President of Shirdi Shri Saibaba Sansthan

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here