Home क्राईम संगमनेरात भांडणे पाहण्याचा राग आल्याने मोटारसायकल पेटविली, दोघांना मारहाण

संगमनेरात भांडणे पाहण्याचा राग आल्याने मोटारसायकल पेटविली, दोघांना मारहाण

Crime News Sangamner Motorcycle set on fire beating both

संगमनेर | Crime News: संगमनेर शहरातील अकोले नाका येथे भांडण पाहण्यासाठी थांबलेल्या दोन तरुणांना मारहाण करत त्यांच्याजवळील मोटारसायकल पेटवून दिल्याची घटना सोमवारी रात्री १०.३० च्या सुमारास घडली.

याप्रकरणी तीन जणांविरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी गोकुळ दिलीप गडगे रा. मालदाड रोड संगमनेर यांनी फिर्याद दिली असून या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घनश्याम बर्डे, सद्दाम, राहुल सोनवणे सर्व रा. भराडवस्ती संगमनेर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, सोमवारी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास अकोले नका परिसर येथे . घनश्याम बर्डे, सद्दाम, राहुल सोनवणे या तिघांत भांडणे सुरु होती. हे भांडण पाहण्यासाठी गडगे व त्याचा मित्र असे दोघे जण थांबले. त्यांना भांडण पाहण्यासाठी थांबल्याचा राग आल्याने तिघांनी त्यांना मारहाण केली. मोटारसायकलमधील पेट्रोल रस्त्यावर सांडल्याने बर्डे याने थेट आग लावून मोटारसायकल पेटवून दिली. या घटनेनंतर गडगे यांनी शहर पोलीस ठाणे गाठले आणि फिर्याद देऊन पोलिसांनी त्या तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.

Web TItle: Crime News Sangamner Motorcycle set on fire beating both

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here