Home Accident News Accident: संगमनेर तालुक्यात दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू

Accident: संगमनेर तालुक्यात दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू

Sangamner Accident of Motracycle young man Death

संगमनेर | Accident: संगमनेर तालुक्यातील कासारे (जांभूळवाडी) शिवारात रस्ता अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना लोणी ते नांदूर शिंगोटे रस्त्यावर सोमवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास कासारे शिवारात घडली.

सागर निवृत्ती जगताप वय २५ ता. भागवतवाडी तळेगाव दिघे असे या अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

तळेगाव येथील सागर जगताप हा तरुण दुचाकीवरून लोहारे येथे प्रवास करत असताना लोहारे शिवारात रस्ता अपघातात  (Accident) डोक्याला जबर मार लागून त्याचा मृत्यू झाला. दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली असावी असा अंदाज आहे. मात्र नक्की कशामुळे अपघात झाला याबाबत निश्चित माहिती प्राप्त झाली नाही.

याबाबत स्थानिक नागरिकांनी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यास माहिती कळविली. याप्रकरणी पोलीस नाईक बाबा खेडकर अधिक तपास करीत आहे.

Web Title: Sangamner Accident of Motracycle young man Death

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here