Home Accident News Accident: डिझेल टँकर उलटून दोन जण ठार

Accident: डिझेल टँकर उलटून दोन जण ठार

Accident Two killed as diesel tanker overturns

कोपरगाव | Accident: नागपूर मुंबई महामार्गावर दहेगाव बोलका शिवारात हॉटेल द्वारकामाई जवळ डिझेल टँकर उलटून अपघात घडला. या अपघातात दोन जण ठार झाले आहे. ही घटना मंगळवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली.

यामध्ये मोटारसायकल चालक गंभीर जखमी रुग्णालयात उपचार सुरु असताना त्याचा मृत्यु झाला. तर डिझेल टँकर चालकाचा दबून मृत्यू झाली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दौलत जाधव यांनी दिली आहे.

कोपरगावकडून वैजापूरच्या दिशेने जाणारा डिझेल टँकर क्रमांक एम एच ४६ बी.बी. ३०६६ हा बैलगाडीला ओव्हरटेक करताना उलटला. एका बैलगाडीला पास करून समोरून येणाऱ्या दुचाकीस्वरास वाचविण्याच्या प्रयत्नात डिझेल टँकर (Accident) पलटी झाला.

कोपरगाव नगरपालिकेचा अग्निशमन बंब बोलावून फोमचा मारा अपघातग्रस्त डिझेल टँकरवर करण्यात आला. तेल रस्त्याच्या कडेला असलेल्या उसाच्या शेतात बराच वेळ वाहत होते.

Web Title: Accident Two killed as diesel tanker overturns

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here