Home अहमदनगर अहमदनगर: दोन मैत्रिणीमध्ये वाद अन तरुणाचा केला विनयभंग

अहमदनगर: दोन मैत्रिणीमध्ये वाद अन तरुणाचा केला विनयभंग

Ahmednagar News:  भांडणे मिटविण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीच्या वेळेस मध्यस्थी करणार्‍या एका तरूणाने तरूणीला शिवीगाळ करून विनयभंग (Molested) केल्याची घटना.

an argument between two friends and a young man molested

अहमदनगर:  दोन मैत्रिणींमध्ये फोटो काढण्यावरून भांडणे झाली होती. ही भांडणे मिटविण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीच्या वेळेस मध्यस्थी करणार्‍या एका तरूणाने तरूणीला शिवीगाळ करून विनयभंग केला. ही घटना शहरातील सिद्धीबाग येथे बुधवारी (14 जून) दुपारी घडली.

शहरातील टिळक रस्त्यावर मंगळवारी (13 जून) दोन मैत्रिणींमध्ये दुपारी तीन वाजता फोटो काढण्यावरून भांडणे झाली होती. ही भांडणे मिटविण्यासाठी बुधवारी दुपारी सिद्धीबाग येथे दोन्ही मैत्रिणीच्या नातेवाईक आले होते. त्यावेळेस यश किशोर राहिंज याने एका तरुणीला अपशब्द वापरले. तिला लज्जा उत्पन्न होईल, असे गैरवर्तन केले. या तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात यश राहिंज याच्याविरूद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: an argument between two friends and a young man molested

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here