Home क्राईम संगमनेर तालुक्यात सर्वेक्षण सुरु असताना आशा सेविकेला मारहाण

संगमनेर तालुक्यात सर्वेक्षण सुरु असताना आशा सेविकेला मारहाण

Asha Sevike beaten during survey in Sangamner

संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यातील बोरबन गावात एका आशा सेविकेला मारहाण केल्याची घटना शनिवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी एका विरोधात घारगाव पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भारत अशोक गाडेकर रा. बोरबन ता. संगमनेर असे गुन्हा झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

घारगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील आशासेविका कुसुम दत्तात्रय गाडेकर यांनी फिर्याद दाखल केली असून या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, बोरबन गावात माझे कुटुंब माझी जबाबदारी या अंतर्गत आरोग्य सर्वेक्षण सुरु होते. ग्रामसेवकाच्या आदेशाने आशासेविका कुसुम गाडेकर या सर्वेक्षणात काम करत होत्या. सर्वेक्षण करीत असताना त्यानी भारत गाडेकर यांच्या पत्नीला मास्क लावा असे सांगितले. याचा राग मनात धरून त्याने आशा सेविका यांना शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच त्यांच्या पतीने मध्यस्थी केली असता त्यानांही मारहाण करण्यात आली. याप्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल खेडकर हे अधिक तपास करीत आहे.

Web Title: Asha Sevike beaten during survey in Sangamner

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here