Home अहमदनगर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला, भाजपा नगरसेवकावर गुन्हा

राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला, भाजपा नगरसेवकावर गुन्हा

Ahmednagar Crime News:  सावेडी उपनगरातील एकविरा चौकात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना समोर आली आहे.

Assault on NCP official, crime against BJP corporator

अहमदनगर: सावेडी उपनगरातील एकविरा चौकात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. शनिवारी रात्री साडे दहाच्या सुमारास ही घटना घडली. अंकुश चत्तर असे हल्ला करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्याचे नाव असून ते जखमी झाले आहे.

चत्तर यांच्यावर भररस्त्यात धारदार शस्त्राने वार करण्यात आले. या हल्ल्यात अंकुश चत्तर गंभीर जखमी झाले आहेत. अंकुश चत्तर यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याप्रकरणी भाजप नगरसेवक स्वप्नील शिंदे, अभिजीत बुलाख, सुरज उर्फ मिक्या कांबळे, विभ्या कांबळे, महेश कुऱ्हे, राजू फुलारीसह सात ते आठ जणांवर तोफखाना पोलीस ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Assault on NCP official, crime against BJP corporator

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here