Home क्राईम ‘मेडिकल’च्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

‘मेडिकल’च्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या प्रथम वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या (SUicide).

Medical student committed suicide by hanging himself

मिरज : मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या प्रथम वर्गात शिकणाऱ्या सिद्धांत सुरेश तांबे (वय १९, रा. मुंबई) या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. सिद्धांत याने मिरजेतील कर्मवीर चौकात अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये गळफास घेतल्याचे शनिवारी दुपारी आढळून आले. पेपर अवघड गेल्याने नैराश्यातून सिद्धांतने टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा होती.

मुंबईतील सिद्धांत तांबे याला मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसला गतवर्षी प्रवेश मिळाला होता. प्रथम वर्षाच्या परीक्षा सुरू असल्याने तो शनिवारी सकाळी कॉलेजला आला नव्हता. त्याच्या मित्रांनी त्याला मोबाइलवर फोन केला. मात्र, त्याच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याने मित्रांनी फ्लॅटकडे धाव घेतली. यावेळी फ्लॅटचा दरवाजा आतून बंद असल्याचे दिसून आले. मित्रांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता सिद्धांतने किचनमध्ये नायलॉनच्या दोरीने गळफास घेतल्याचे दिसले.

याबाबत माहिती मिळाल्यानंतर मिरज शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मिरज शासकीय रुग्णालयात पाठविला.

Web Title: Medical student committed suicide by hanging himself

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here