Home क्राईम संगमनेर: रात्रीच्या वेळी तिघांनी टेम्पो चालकास लुटले

संगमनेर: रात्रीच्या वेळी तिघांनी टेम्पो चालकास लुटले

Sangamner Robbed: लोणी ते नांदूर शिंगोटे रस्त्यावर जांभूळवाडी शिवारात रात्रीच्या वेळी तिघा चोरट्यांनी टेम्पो चालकास लुटल्याची घटना.

at midnight tempo Driver Robbed

संगमनेर: संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे मार्गे असलेल्या लोणी ते नांदूर शिंगोटे रस्त्यावर जांभूळवाडी शिवारात रात्रीच्या वेळी तिघा चोरट्यांनी टेम्पो चालकास लुटल्याची घटना घडली आहे.

टेम्पो चालका जवळील रोख रकमेसह 26 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

संगमनेर तालुक्यातील पिंपळे येथील अमोल गवराम कोटकर हे त्यांच्या ताब्यातील टेम्पो लोणी येथून पिंपळे गावाकडे घेऊन जात होते. दरम्यान जांभुळवाडी शिवारात फौजी ढाब्याच्या समोर तिघा अज्ञात चोरट्यांनी काळ्या रंगाच्या पल्सर मोटरसायकलवरून येत रात्री 11.30 वाजेच्या सुमारास टेम्पोच्या केबिनमध्ये घुसून चालक अमोल कोटकर यांच्याकडील 9 हजार रुपये रोख, मोबाईल, एटीएम कार्ड व लायसन सहित अन्य चीज वस्तू असा मिळून 26 हजार 500 रुपयांचा ऐवज लंपास केला.

याप्रकरणी अमोल कोटकर यांनी पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. प्रभारी पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुका पोलीस या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.

Web Title: at midnight tempo Driver Robbed

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here