Home नंदुरबार अल्पवयीन मुलीची विक्री करून लग्न लावण्याचा भयंकर प्रकार, तसेच अत्याचार

अल्पवयीन मुलीची विक्री करून लग्न लावण्याचा भयंकर प्रकार, तसेच अत्याचार

Rape Crime: मुलीच्या इच्छेविरुद्ध तीन ते चार महिने शारीरिक संबंध ठेवून तिच्यावर अत्याचार.

selling and marrying a minor girl, as well as Rape

नंदुरबार: सातपुडा येथील धडगाव तालुक्यात अल्पवयीन मुलीला विक्रीची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीची विक्री करून लग्न लावण्याचा भयंकर प्रकार समोर आला आहे.

मुलीच्या आई-वडिलांची फसवणूक केल्याप्रकरणी सोलापूर जिल्ह्यातील चार जण तसेच धडगाव तालुक्यातील दोघे अशा एकूण सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पीडितेवर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी विरोधात बलात्काराचा गुन्हा करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडितेच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की,  धडगाव तालुक्यातील तेलखेडी येथील अल्पवयीन मुलीला संदीप सुकलाल पावरा, संगीता संदीप पावरा यांनी पाहुणी म्हणून घरी घेऊन जात असल्याचे सांगितलं. सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील टेंभुर्णी येथे सुप्रिया महाडिक यांच्या मध्यस्थीने गोविंद नावाच्या व्यक्तीला तीन लाख साठ हजार रुपयांमध्ये पीडितेची विक्री करून लग्न लावल्याची संतापजनक घटना घडलीय.

गोविंदने मुलीच्या इच्छेविरुद्ध तीन ते चार महिने शारीरिक संबंध ठेवून तिच्यावर अत्याचार (Sexually abused) केला. याप्रकरणी पीडितेच्या वडिलांनी धडगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करत आरोपीविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला. अधिक तपास पोलीस करीत आहे.

Web Title: selling and marrying a minor girl, as well as Rape

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here