संगमनेरमध्ये दोन एटीम फोडून बावीस लाखांची चोरी
संगमनेरमध्ये दोन एटीम फोडून बावीस लाखांची चोरी
संगमनेर: शहरातील नाशिक पुणे महामार्गावरील ओरेंज कॉर्नर व मालदाड रस्ता येथील एस बी आय व कॅनेरा बँकेचे एटीम सेंटर चोरट्यांनी बुधवारी मध्यरात्री फोडले.
ओरेंज कॉर्नर येथील एटीम सेंटर स्टेट बँकेचे तर मालदाड रस्ता येथील एटीम सेंटर कॅनेंरा बँकेचे आहे. या दोन्ही एटीम सेंटर मधील कॅश बॉक्स गॅस कटर ने तोडून त्यातील सुमारे बावीस लाख रुपये चोरट्यांनी पळविले.
You May Also Like:Shahid Kapoor wife age | Mira Rajput
बुधवारी मध्यरात्री दोन्ही एटीम सेंटर अज्ञात चोरट्यांनी गॅस कटर साहायाने फोडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ऑरेंज कॉर्नर येथील एटीम सेंटर आठ महिन्यांपूर्वी फोडण्यात आले होते. पुन्हा येथेच चोरीची घटना घडली आहे. एस. बी.आय च्या एटीम मधून चोरट्यांनी १९ लाख ४२ हजार तीनशे रुपये तर कॅनेरा बँकेच्या एटीम मधून २ लाख ६२ हजार असा एकूण २२ लाख ४ हजार तीनशे रुपयांची रक्कम चोरट्यांनी लुटून नेली. चोरी नंतर चोरट्यांनी एटीम मशीनची तिजोरी रस्त्यावर फेकून दिली. पोलीस घटनास्थळी जाऊन ठसे तज्ञांना पाचारण करून तपास सुरु केला आहे. शहरात असलेल्या चोरी सत्रामुळे भीतीचे वातावरण पसरले असून चोरट्यांनी पोलिसांपुढे मोठे आवाहन उभे केले आहे.
आमच्या संगमनेर अकोले न्यूजच्या व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद. संगमनेर अकोले न्यूज–येथे क्लिक करा.
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.