Home महाराष्ट्र शनी शिंगणापूर: देवस्थानच्या विश्वस्त महिलेचा विनयभंग व मारहाण

शनी शिंगणापूर: देवस्थानच्या विश्वस्त महिलेचा विनयभंग व मारहाण

शनी शिंगणापूर: देवस्थानच्या विश्वस्त महिलेचा विनयभंग व मारहाण

नेवासा : शनैश्वर देवस्थानच्या महिला विश्वस्ताचा विनयभंग व मारहाण केल्याप्रकरणी विश्वस्त वैभव सुखदेव शेटे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच नवनाथ भास्कर शेटे, मयूर जालिंदर देठे, बलभीम भाऊराव दाणे (सर्व रा.शनी शिंगणापुर ता.नेवासा) यांच्यासह ८ ते १० जणांच्या विरोधात विनयभंग व  मारहाणीचा गुन्हा शनी शिंगणापूर पोलीस स्टेशन मध्ये दाखल करण्यात आला आहे.

You May Also Like:Shahid Kapoor wife age | Mira Rajput

याबाबत महिला विश्वस्तानी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि ३१ जुलै २०१८ रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास शनी मंदिर येथे प्रशासकीय कार्यालयात मिटिंग हॉलमध्ये मिटिंगच्या कामासाठी पती समवेत गेले होते. मागील महिन्यात झालेल्या उपोषण संदर्भातील कागदपत्रांच्या नकला रजिस्टर झेरॉक्स प्रति उपोषण कर्त्यांना देण्याकरिता मिटिंग चालू होती. त्यावेळी मयूर देठे हा मोबाइलवर मिटिंगची शूटिंग काढत होता. त्यावेळी सर्व विश्वस्त उपस्थित होते. दरम्यान त्याला मी ‘तू शूटिंग काढू नको’ असे म्हटले असता याचा त्याला व इतर जमलेल्या काही लोकांना राग आला. त्यावेळी मयूर जालिंदर देठे याने त्याचे हातातील मोबाईलचा कॅमेरा बंद केला असता वैभव शेटेसह ८ ते १० जणांनी मला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून हाताला धरून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल. मला लाथा बुक्कयांनी मारहाण केली. माझ्या हातावर मारल्याने हातातील बांगडीच्या काचा फुटून त्या हातात घुसल्या आहे. माझ्या पतीला ही धक्काबुक्की केली आणि  जिवे मारण्याची धमकी दिली. यामध्ये माझे गळ्यातील दागिने तुटून गहाळ झाले आहेत, असे महिला विश्वस्ताने फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी विनयभंग तसेच मारहाणीचा गुन्हा शनी शिंगणापूर पोलीस स्टेशन मध्ये दाखल करण्यात आला आहे.

Fashion Ad

आमच्या संगमनेर अकोले न्यूजच्या व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद. संगमनेर अकोले न्यूज–येथे क्लिक करा.


ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment News, Sangamner Taluka News, Akole Taluka News, C News Sangamner and local news from all cities of Maharashtra.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here