Home संगमनेर संगमनेरला चौघांविरुद्ध अॅट्रॉसिटीचा गुन्हा; दोघांना अटक

संगमनेरला चौघांविरुद्ध अॅट्रॉसिटीचा गुन्हा; दोघांना अटक

Breaking News | Sangamner Crime: जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केल्याच्या आरोपावरून चौघांवर गुन्हा दाखल तर दोघांना अटक.

Atrocity charges against Sangamner both arrested

संगमनेर : सार्वजनिक ठिकाणी जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण झाली म्हणून बोभाटा करतो का, असे विचारत जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केल्याच्या आरोपावरून तालुक्यातील मंगळापूर येथील चार जणांच्या विरोधात संगमनेर शहर पोलिसांत अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार (अॅट्रॉसिटी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी दोन जणांना अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले.

याबाबत सुभाष रुपवते (रा. मंगळापूर) यांनी फिर्याद दिली आहे.  सार्वजनिक ठिकाणी जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण झाली म्हणून बोभाटा करतो का, असे विचारत जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली. यामध्ये  नीलेश पोपट भोकनळ, ज्ञानेश्वर यादव भोकनळ व साई सूर्यवंशी (रा. अकोले नाका, संगमनेर) आणि अज्ञात एका व्यक्तीचा आरोपींमध्ये समावेश आहे.

Web Title: Atrocity charges against Sangamner both arrested

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here