Home पुणे Uday Samant: उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला

Uday Samant: उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला

Uday Samant: गाडीवर संतप्त शिवसैनिकांनी हल्ला केला व गाडी फोडली.

Attack on Uday Samant's car

पुणे: कात्रज चौकात आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदार, खासदारांचा आपल्या रोख ठोक शैलीत समाचार घेतला. ही सभा संपत असताना याच चौकात माजी शिक्षणमंत्री व बंडखोर आमदार उदय सामंत हे आमदार तानाजी सावंत यांच्या घराकडून चारचाकी वाहनातून जात असताना सिग्नलला गाडी थांबल्यावर त्यांच्या गाडीवर संतप्त शिवसैनिकांनी हल्ला केला व गाडी फोडली.

“आम्ही गद्दारांना कात्रजचा घाट दाखवला”, “गद्दारांना क्षमा नाही आशा भाषेत शिवसैनिकांनी भावना व्यक्त केल्या.

कात्रज भागात उदय सामंत है मुंबईच्या दिशेने जात असताना शिवसैनिकांनी त्यांची गाडी अडवली त्यांची गाडी अडवत गाड्यांवर फटके मारत चपला आणि बाटल्या देखील फेकले. आदित्य ठाकरे यांच्या सभेसाठी शिवसैनिकांची मोठी गर्दी होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील पुण्यात होते. सामंत हे आज दिवसभर शिंदे यांच्यासोबत होते. शिंदे हे भोजनासाठी कात्रज चौकत असलेल्या तानाजी सावंत यांच्या निवासस्थानी भोजनासाठी गेले होते. सामंत हे त्यांच्यासोबत होते. तेथून ते मुंबईकडे जात असतानाच आदित्य यांची सभा संपवून निघालेल्या शिवसैनिकांच्या कचाट्यात सामंत यांची गाडी सापडली.

सामंत म्हणाले, “माझ्या गाडीवर झालेला हा भ्याड हल्ला आहे. गाडी सिग्नलला थांबली असताना २० ते २५ जणांनी माझ्या गाडीवर हल्ला केला. त्यांच्या हातात दगड व बेसबॉल स्टिक होत्या. मला आदित्य साहेबांची सभा आहे याची कल्पना नाही. माझ्या गाडी केवळ सिग्नलला थांबली होती. त्यावेळी ठरवून हा हल्ला झाला. मी कोणत्याही धमक्यांना घाबरत नाही.

Web Title: Attack on Uday Samant’s car

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here