Home भंडारा बेशुद्धावस्थेत आढळली निर्वस्त्र महिला

बेशुद्धावस्थेत आढळली निर्वस्त्र महिला

Sexually abused: महिलेवर अत्याचार झाल्याचा संशय. a naked woman was found.

a naked woman was found unconscious

भंडारा : राष्ट्रीय महामार्गालगत शेतात बेशुद्धावस्थेत एक निर्वस्त्र महिला आढळल्याची घटना भंडारा तालुक्यातील कन्हाळमोह येथे मंगळवारी सकाळी उघडकीस आली. या महिलेवर अत्याचार झाल्याचा संशय असून, प्रकृती गंभीर असल्याने उपचारासाठी नागपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आले.

भंडारा शहरापासून दहा किलोमीटर अंतरावर राष्ट्रीय महामार्गालगत एका शेतात बेशुद्धावस्थेत निर्वस्त्र महिला असल्याची माहिती स्थानिकांनी कारधा पोलिसांना दिली. पोलीस तत्काळ घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळावरील दृश्य पाहून पोलीसही हादरले.

गावकऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी त्या महिलेला सर्वप्रथम कपडे घातले. तत्काळ भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले; परंतु प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तिला नागपूर येथे रवाना करण्यात आले. प्राथमिक माहितीनुसार ही महिला ३५ वर्षे वयोगटाची असून, गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील रहिवासी असल्याचे सांगण्यात आले. गावी जाण्यासाठी ती गोरेगाव येथे आली होती. तेथे ओळखीच्या व्यक्तीने पिकअप वाहनातून तिला घरी सोडून देतो, असे सांगितले. मात्र, त्यानंतर तिच्यावर त्या वाहनातच दोन जणांनी अत्याचार केल्याची माहिती आहे. त्यानंतर बेशुद्धावस्थेत तिला राष्ट्रीय महामार्गावरील कन्हाळमोह शिवारातील एका शेतात फेकून दिले.

Web Title: a naked woman was found unconscious

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here