Home अकोले अकोलेतील घटना: भेटायला आलेल्या पाहुण्यांवर हल्ला, वाहन दगडाने ठेचले

अकोलेतील घटना: भेटायला आलेल्या पाहुण्यांवर हल्ला, वाहन दगडाने ठेचले

Akole Crime: वाहन दगडाने ठेचले आजीला भेटायला आले होते, जावयाला  शिवीगाळ व  मारहाण केली.

Attack on visiting guests crime Filed

कोतूळ : घरातील वृद्ध आजेसासूला भेटायला आलेल्या नात जावयाची गाडी अक्षरशः ठेचून काढली, ही घटना रस्त्याच्या वादातून घडली. मात्र, कोतूळ परिसरात पाहुण्यांवर हल्ला होण्याची घटना पहिल्यांदाच घडली आहे.

सविस्तर वृत्त असे की, कोतूळ येथील सुरेश वामन देशमुख यांच्या व लक्ष्मण नामदेव गोडे यांच्यात गेल्या काही वर्षांपासून रस्त्याचा वाद न्यायालयात सुरू आहे. दरम्यान, सुरेश देशमुख यांच्या नव्वद वर्षे वयाच्या आईची तब्येत ढासळली असल्याने, अनेक पाहुणे भेटायला येत होते. दरम्यान, वृद्ध आजीचे नातजावई व सुरेश देशमुख यांचे जावई अमोल सुधाकर आरोटे या संगमनेर रविवारी रात्री आठ वाजता कोतूळला भेटायला आले असता, या वादाचे रस्त्याच्या कडेला हुंदाई कंपनीची चारचाकी गाडी उभी केली होती. आरोपी लक्ष्मण गोडे व जितेंद्र गोडे यांनी आरोटे यांना शिवीगाळ मारहाण केली, तसेच लक्ष्मण गोडे, भरत नामदेव गोडे, जितेंद्र लक्ष्मण गोडे, इंदिरा लक्ष्मण गोडे, सरला भरत गोडे व अन्य दोघे अनोळखी यांनी आरोटे यांच्या चारचाकी गाडीला दगडाने ठेचून काढले रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.

एकाच वेळी दोन पदांवर पल्लवी बांडेची निवड, काय आहे तिच्या यशामागील गुपित जाणून घ्या | Motivational

पोलिस निरीक्षक मिथुन घुगे यांनी घटनास्थळी भेट दिली, तर पोलिस नायक बाळासाहेब गोराणे पुढील तपास करीत आहेत.

Web Title: Attack on visiting guests crime Filed

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here